दिवाळीनंतर टोमॅटोचे दर गडगडलेलेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनंतर टोमॅटोचे दर गडगडलेलेच
दिवाळीनंतर टोमॅटोचे दर गडगडलेलेच

दिवाळीनंतर टोमॅटोचे दर गडगडलेलेच

sakal_logo
By

63713
---------
दिवाळीनंतर टोमॅटोचे दर गडगडलेलेच
उत्पादन खर्चही निघणे मुश्कील; किलोला सहा ते दहा रुपये दर
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. २१ ः सोयाबीन, भुईमूग यांसह इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानीतून शेतकरी कसेबसे सावरत असताना शेतकऱ्यांना सध्या टोमॅटोच्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. दिवाळीपूर्वी थोडा समाधानकारक असणारा दर दिवाळीनंतर गडगडला आहे, तो अद्याप तसाच आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
सध्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यात टोमॅटोचे फड बहरले आहेत. मात्र बाजार कोसळले आहेत. बाजारपेठेत किलोला ६ ते १० रुपये भाव मिळत असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परीस्थिती आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी एप्रिल, मे व जूनमध्ये टोमॅटो उत्पादकांना दराची लॉटरी लागली होती. मात्र जुलैच्या संततधार पावसामुळे टोमॅटोच्या झाडांवर परिणाम होत राहिला. मागणी कमी झाल्याने टोमॅटोचे दर गडगडले होते. त्यानंतर दिवाळीपूर्वी काही दिवस किलोस २५ ते ४० रुपये दर राहिला. त्यानंतर पुन्हा दर कोसळले. ते अद्याप तसेच आहेत. लाखो रुपये खर्च करून हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी नुकसानीच्या खाईत लोटला जात आहे.
----------
दिवाळीनंतर टोमॅटोचे दर कोसळले आहेत. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. दर वाढेल अशी आशा ठेवून टोमॅटो बाजारपेठेत पाठवित आहे.
-उदय आलमाने, टोमॅटो उत्पादक, दानोळी
---------
गेल्या आठ महिन्यांचे बाजारपेठेतील घाऊक टोमॅटोचे दर (किलोस)
महिना- दर
एप्रिल, मे - ५५ ते ७० रुपये
जून - २५ ते ३० रुपये
जुलै, ऑगस्ट - ८ ते १२ रुपये
सप्टेबर, ऑक्टोबर- २० ते ३५
नोव्हेंबर- ६ ते १०
--------
दृष्‍टिक्षेप
-एकरी एकूण येणारा खर्च- १०३८०० रुपये (काट्या व ठिबक स्वत:चे असल्यास इतका खर्च)
पूर्वमशागत (पल्टी, रोटर, सरी, मल्चिंग) - २००००
टोमॅटो रोपे व लावण - २१८००
खते व लागवड (विद्राव्यसह) - १४०००
आंतरमशागत -४०००
औषध फवारणी - १५०००
काट्या रोवणे, तार ओढणे- ६०००
सुतळी - ८०००
वेल बांधणी- १५०००
टोमॅटो तोडणे, बाजारपेठेला पाठवणे हा खर्च वेगळा