विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर दीपस्तंभाची पायाभरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर दीपस्तंभाची पायाभरणी
विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर दीपस्तंभाची पायाभरणी

विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर दीपस्तंभाची पायाभरणी

sakal_logo
By

63738
-------------------------------------------------
विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर
दीपस्तंभाची पायाभरणी
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. २१ : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर दीपस्तंभाची पायाभरणी उत्साहात झाली. निडसोशी मठाचे जगद्‍गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. जरळीचे सुपुत्र व कर्नाटकचे निवृत्त पोलिस अधीक्षक अशोक सदलगी प्रमुख पाहुणे होते.
गावातील निवृत्त सुभेदार तमन्ना धनगर-पाटील यांनी या कामासाठी अडीच लाखांची देणगी दिली असून यातून हा दीपस्तंभ उभारण्यात येणार आहे. शिवलिंगेश्वर स्वामी म्हणाले, ‘देणगीच्या माध्यमातून लवकर दीपस्तंभ उभे राहील यादृष्टीने सर्वांनी साथ द्यावी.’ अशोक सदलगी म्हणाले, ‘देणगीतून व सर्वांच्या सहकार्याने दीपस्तंभाची उभारणी होत आहे.’
माजी मुख्याध्यापक टी. एम. दुंडगे यांनी स्वागत केले. अजित स्वामी यांनी पौरोहित्य केले. रामापा करीगार, गोडसाखरचे नूतन संचालक सोमनाथ पाटील, कर्नाटक वन खात्याचे अधिकारी चंद्रशेखर आप्पाण्णावर, संकेश्वरचे नगरसेवक शंकराव हेगडे, राजू खमलेटी, रमेश आरबोळे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार झाला. रामाप्पा करीगार, रमेश आरबोळे, मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांची भाषणे झाली. आजारी निरंजन जाधव याच्या उपचारासाठी धनगर समाजातील व्यक्तींनी मदत दिली. श्री. पाटील यांनी एक लाख रुपये मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले. निंगाप्पा धनगर, रामा धनगर, शामराव धनगर, मधुकर वाघमोडे, अण्णासाहेब देसाई, राम पाटील, यल्लाप्पा धनगर, रामचंद्र धनगर, विठ्ठल धनगर आदी उपस्थित होते. सुरेश धनगर यांनी आभार मानले.