त्या शिक्षकाचा निलंबन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या शिक्षकाचा निलंबन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करा
त्या शिक्षकाचा निलंबन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करा

त्या शिक्षकाचा निलंबन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद .... लोगो
....

‘त्या’ शिक्षकाचा निलंबन प्रस्‍ताव सादर करा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर , ता. २१ : पन्‍हाळा तालुक्यामधील एका शाळेतील शिक्षकाने अल्‍पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकास पोक्सो‍ कायद्याखाली अटक करण्यात आली. तर सोमवारी (ता. २१) मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. तत्‍पूर्वी, चौकशीस गेलेल्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा सविस्‍तर अहवाल सीईओ चव्‍हाण यांच्याकडे सादर केला.
संबंधित शिक्षक हा ६० टक्‍के दिव्यांग आहे. तो चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य वर्तन करत होता. त्यामुळे मुलींनीही शाळेकडे पाठ फिरवली होती. तीन मुलींशी अशाच प्रकारे असभ्य वर्तन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून एका मुलीने धाडसाने याबाबतची तक्रार पालकांकडे केली. यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याखाली अटक केली. रविवारी या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, जिल्‍हा परिषदेच्या महिला अधिकाऱ्यां‍ना या मुलींच्या कुटुंबीयांकडे चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी सविस्‍तर माहिती घेऊन अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित शिक्षकास निलंबित करण्याचा निर्णय घेण्‍यात आला. तसेच पोक्सो कायद्याबाबत जनजागृती करणे, मुलांना स्‍पर्श करण्याचे विविध प्रकार, चांगला स्‍पर्श आणि धोकादायक स्‍पर्श याची माहिती देणे आवश्यक असल्याचे या अहवाल सादरीकरणावेळी सांगण्यात आले. यावर पुढील काही दिवसात सर्वच शाळांमध्ये याबाबतची जनजागृती करण्याची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी घेतली.
....

शाळा व्यवस्‍थापन
समित्या करतात काय?

प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्‍थापन समिती कार्यरत आहे. यामध्ये पालकांसह शिक्षकांचाही समावेश आहे. पालकांनी वेळोवेळी शाळेला भेटी देऊन, मुलांशी संवाद साधून चर्चा करणे आवश्यक आहे. मात्र फारच कमी शालेय समित्या या पद्ध‍तीने काम करतात. त्यामुळे चुकीचे वागणाऱ्या‍ शिक्षकांना अद्दल कशी घडणार, हा खरा प्रश्‍‍न आहे. शाळेत चुकीचे प्रकार घडू नयेत, यासाठी समितीने सक्रिय काम करणे आवश्यक आहे.