शिवसेनेच्यावतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्यावतीने
शिवसेनेच्यावतीने

शिवसेनेच्यावतीने

sakal_logo
By

सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध
आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा

ना हरकत दाखल्यांची माहिती देण्याची मागणी

कोल्हापूर, ता. २१ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पंधरा वर्षांपासून आपल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने शासनाच्या निधीचा बेकायदेशीररित्या गैरवापर करून लूट करण्यात आल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातही गेल्या पंधरा वर्षांत शासनाचा निधी कुठे खर्च झाला तसेच महापालिकेकडून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ना हरकत दाखल्यांची सविस्तर माहिती दहा दिवसांत मिळाली पाहिजे, नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज निवेदनाद्वारे दिला.
शिवसेनेच्या प्रबोधन यात्रा मेळाव्यात ही माहिती मागवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा निधी हा कोणाच्या खिशातला नसून तो जनतेच्या करातून जमा झालेला निधी आहे. त्याचा वापर योग्य कारणासाठी झाला पाहिजे. जे काम केले जाईल ते कायदेशीररित्या व दर्जेदार झाले पाहिजे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्यामुळे हा निधी टक्केवारीच्या रुपात लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या खिशात जात आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते किंवा ले-आऊट नसतानाही अनेक ठिकाणी महानगरपालिका अधिकाऱ्यांचा बोगस ना हरकत दाखला घेऊन शासनाच्या निधीवर डल्ला मारला जात आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनील मोदी आदी उपस्थित होते.
....

...
... तर चर्चा करणार नाही

तुमचे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या संगनमताने १८ टक्के टक्केवारी घेतात. याबद्दल आम्हाला चर्चा करायची आहे, असे पवार यांनी सांगताच, तुम्ही या विषयावर असे बोलणार असाल तर यावर मी काहीही बोलू शकत नाही, असे अधीक्षक अभियंता कुंभार यांनी सांगितले.