आरोग्य सेवेचा नियमित आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सेवेचा नियमित आढावा
आरोग्य सेवेचा नियमित आढावा

आरोग्य सेवेचा नियमित आढावा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून
.....

आरोग्य सेवेचा नियमित आढावा

राज्यस्‍तरावरून अधिकाऱ्यांची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २१ : जिल्ह्यातील आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या कार्यक्रमांचे दरमहा सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावरून नोडल अधिकारी म्‍हणून डॉ. रामचंद्र हंकारे, उपसंचालक, आरोग्य सेवा (आरसीएच) यांची नियुक्‍ती केली आहे. आज हंकारे यांनी जिल्‍हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात ग्रामीण व महापालिकेतील अधिकाऱ्यां‍ची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण, जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्‍थित होते.
राज्यातील आरोग्य सेवेशी संबंधित क्षयरोग, कुष्ठरोग, कोविड लसीकरण आणि कीटकजन्य आजार या महत्त्वाच्या कार्यक्रमांचा व इतर सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सन २०२२-२३ मध्ये सर्व निर्देशांकाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यावेळी झालेल्या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरसीएच ऑफिसर, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, एमओडिटीटी, डिएमओ, तसेच सर्व जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी, तसेच महानगरपालिकेतील आरोग्य सेवेशी संबंधित शहर क्षयरोग अधिकारी, आरसीएच ऑफिसर, नोडल ऑफिसर लेप्रसी साथरोग, वैद्यकीय अधिकारी प्रसूतीगृह, वैद्यकीय अधिकारी हेल्थ पोस्ट, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक व महानगरपालिका स्तरावरील सर्व कार्यक्रम अधिकारी उपस्‍थित होते.