प्रशिक्षणातून सहकार चळवळ गतीमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षणातून सहकार चळवळ गतीमान
प्रशिक्षणातून सहकार चळवळ गतीमान

प्रशिक्षणातून सहकार चळवळ गतीमान

sakal_logo
By

63845
---------------------------------------------------------
प्रशिक्षणातून सहकार चळवळ गतीमान
एम. एल. चौगुले : गडहिंग्लजला ''रवळनाथ''तर्फे सहकार स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : दैदिप्यमान शतकी परंपरा लाभलेली सहकार चळवळ अधिक मजबूत व गतीमान होण्यासाठी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचार्‍यांसाठी वेळोवेळी सहकार प्रशिक्षण शिबीरे घेतली जातील, अशी घोषणा श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी केली.
६९ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त रवळनाथतर्फे आयोजित तालुक्यातील विविध सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सहकार स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. बँका, पतसंस्था, दूध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते.
चौगुले म्हणाले, ‘खासगी वित्तीय संस्थांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी संस्थांत नवी आव्हाने पेलण्याची क्षमता हवी. त्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. त्यासाठी रवळनाथने पुढाकार घेतला आहे.’
विनोद नाईकवाडी म्हणाले, ‘आयकर, जीएसटीबाबत येणाऱ्‍या नोटीसांमुळे पतसंस्था चालक हैराण झाले आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्‍यांकडून योग्य मार्गदर्शन मिळावे.’ दयानंद पाटील, विश्‍वनाथ चव्हाण, विश्‍वास देवाळे, राजेंद्र खोराटे, शिवाजीराव ककडे, सुनिल हत्ती, रफिक पटेल, आझाद शेख, गुलाबराव पाटील, राजेश पाटील-औरनाळकर, सतीश रेडेकर, रामगोंडा सरदार, जोतिबा पाटील यांची भाषणे झाली. रवळनाथचे संचालक महेश मजती यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रवळनाथचे सीईओ दत्तात्रय मायदेव यांनी स्वागत केले. संचालक डॉ. आर. एस. निळपणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. दत्ता पाटील व संचालिका मीना रिंगणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजयकुमार घुगरे यांनी आभार मानले.
---------------
* रवळनाथमुळे बँक वाचली
संस्थापक अध्यक्ष चौगुले यांच्या प्रयत्नानेच गडहिंग्लज अर्बन बँक वाचली. बँकेचा सभासद म्हणून मी चौगुलेंचा ऋणी असून रवळनाथचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत, असे राजेश पाटील-औरनाळकर, सहायक सरव्यवस्थापक सुनील हत्ती यांनी सांगितले.