सवलत योजनेचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सवलत योजनेचा लाभ
सवलत योजनेचा लाभ

सवलत योजनेचा लाभ

sakal_logo
By

घरफाळा सवलत योजनेचा
७९ हजार जणांनी घेतला लाभ

कोल्हापूर, ता. २१ : महापालिकेतर्फे घरफाळ्यात दिल्या जात असलेल्या सवलत योजनेचे दहा दिवस राहिले आहेत. आतापर्यंत ७९ हजार ६४ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन ४३ कोटी ३९ लाख ३६ हजारावर घरफाळा भरला आहे.
शहरातील १ लाख ५५ हजाप मिळकतींची बिले दिली आहेत. यासाठी सवलत योजना जाहीर केली होती. एकरकमी भरणा करणाऱ्या ७९०६४ नागरिकांनी १ एप्रिल ते २१ नोव्हेंबर अखेर ४३ कोटी ३९ लाख ३६ हजार इतक्या रुपयांचा भरणा केला. त्यातील २०६१४ करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेतून पैसे भरले. आता २ टक्के सवलत सुरू असून, शेवटचे १० दिवस आहेत. १ डिसेंबरपासून या बिलावर दंडाची आकारणी सुरू होणार आहे. तरी मिळकतधारकांनी जास्तीत जास्त करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा व दंडाचा प्रसंग टाळावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.