वृत्तपत्र बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र बातमी
वृत्तपत्र बातमी

वृत्तपत्र बातमी

sakal_logo
By

फोटो-६३८६८

शैक्षणिक मदतीसाठी मुश्रीफांना निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्यांचा पुढाकार ः वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीसाठी संघटना सरसावली

कोल्हापूर, ता. २१ ः वृत्तपत्र विक्रेते कुमार कुपटे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीमुळे त्यांची मुलगी स्नेहलच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन तिच्यामागे उभी राहिली असून असोसिएशनतर्फे स्नेहलच्या शैक्षणिक खर्चासाठी मदतीसाठी आमदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. फौंडेशनच्या माध्यमातून स्नेहलला मदतीचे आश्‍वासन श्री. मुश्रीफ यांनी दिले.
वृत्तपत्र विक्रेते कुमार कुपटे यांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय त्यांचा नववीमध्ये शिकत असलेला मुलगा सार्थक पुढे चालवत आहे. या व्यवसायावर कुटुंबाची गुजराण चालू आहे. त्यातच मोठी मुलगी कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आर्थिक परस्थिती बेताची असल्यामुळे शैक्षणिक फी भरणे मुश्कील झाले आहे. तिचे शिक्षण आर्थिक कारणामुळे थांबू नये म्हणून कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेने पुढाकार घेतला आहे.
त्यातून हसन मुश्रीफ फौंडेशन च्या वातीने आर्थिक मदत मिळावी म्हणून शुक्रवारी (ता. १८) कागल येथे आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन माहिती देत मदतीसाठी पत्र दिले. यावर तत्काळ आर्थिक मदत देण्याचे आश्वासन श्री. मुश्रीफ यांनी दिले. यावेळी किरण व्हणगुत्ते, सुरेश ब्रम्हपुरे, अंकुश परब, राजाराम पाटील, रमेश जाधव, संदीप गिरी, अमर पाटील, शिवाजी मगदूम, जय चौगले उपस्थीत होते.