पाणीपुरवठा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा विस्कळीत
पाणीपुरवठा विस्कळीत

पाणीपुरवठा विस्कळीत

sakal_logo
By

पाणीपुरवठ्याची घसरलेली
गाडी रूळावर येणार कधी?

शिंगणापूर उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडीत

कोल्हापूर, ता. २१ ः गेल्या आठवड्यापासून शहरातील पाणीपुरवठ्याची घसरलेली गाडी आजही रूळावर आलेली नाही. सकाळी शिंगणापूर उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने तसेच कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीमुळे ई वॉर्डमधील अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नाही.
शहरात रस्त्यांच्या समस्येबरोबरच पाणीपुरवठ्याची समस्या सतत डोके वर काढत आहे. सध्या थंडीचा कालावधी असल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. पण कधी ए, बी, ई वॉर्ड तर कधी सी, डी तर काहीवेळेस सर्व शहराचा पाणीपुरवठा बंद होत आहे. त्यासाठी तांत्रिक बिघाड, गळती, पाणी कमी, महावितरणची दुरूस्ती अशी अनेक कारणे दिली जात आहेत. गेल्या आठवड्यापासून अचानक भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाली. त्यातून शहरासाठी लागणाऱ्या पाण्याचा उपसा करता आला नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला. काही भागात अपुरा तर काही भागांमध्ये पाणीच आले नाही. त्यानंतर महापालिकेने पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर शनिवारपासून पातळी स्थिर होऊ लागली. तशातच रविवारी कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातील स्टार्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ई वॉर्डच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. ती दुरूस्ती झाल्यानंतर सोमवारी सर्वत्र व्यवस्थित पाणी पुरवठा होईल असे सांगितले जात असताना सकाळी शिंगणापूर उपसा केंद्राचा वीजपुरवठा देखभालीसाठी खंडीत करण्यात आला. त्यामुळे उपशावर परिणाम झाला. उपसा बंद असल्याने कसबा बावडा येथील केंद्रातील दुरूस्ती महापालिकेने करून घेतली. त्यामुळे कावळा नाका, टेंबलाई टेकडी तसेच ताराबाई पार्क या टाक्यांतून होणारा ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहिला. त्यातून शाहूपुरी चौथ्या गल्लीत तर गेल्या आठवड्यापासून पाणीच आले नसल्याने नागरिक संतापले आहेत.