सीमाप्रश्‍न जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीमाप्रश्‍न जोड
सीमाप्रश्‍न जोड

सीमाप्रश्‍न जोड

sakal_logo
By

चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई
सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री

मुंबई : महाराष्ट्र सरकारने संपूर्ण लक्ष सीमाप्रश्नावर केंद्रित केले असून, लवकरच पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांची नेमणूक केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडून समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोघांची नियुक्ती केली असून, इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी समन्वयक मंत्री पुढाकार घेतील. तसेच सीमाप्रश्र्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भेट घेतली जाईल व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी बैठकीत दिली.
-----------------------
‘सर्वोच्च’मध्ये उद्या सुनावणी
सीमाप्रश्र्नी बुधवारी (ता. २३) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. यावेळी कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीवेळी कर्नाटकने वेळ मागून घेतली होती, मात्र त्यावेळी खंडपीठाने अनेक वर्षे याचिका प्रलंबित असल्याने पुढील तारखेला सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन दाव्याला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.