करवीर तहसीलदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर तहसीलदार
करवीर तहसीलदार

करवीर तहसीलदार

sakal_logo
By

‘जुनी पेन्शन योजना लागू करा’
कोल्हापूर ः जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी करवीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच एनपीएस हटाव सप्ताहास सुरवात करण्यात आली. ‘महसूल’च्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस अनिल लवेकर व पुरवठा अव्वल कारकून दत्तात्रय पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. एमसीपी हटाव आणि जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा जोरदार घोषणांनी करवीर तहसील कार्यालय दणाणून गेले. दरम्यान, विधानसभेत याविषयी प्रश्न उपस्थित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे. राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांना अखिल शेख, अंकुश रानमाळे, नंदकुमार इंगवले यांनी निवेदन दिले. यावेळी संजय क्षीरसागर, दत्तात्रय पाडळकर, विठ्ठल वेलणकर, राजू आंबेकर, प्रशांत मिसाळ, विद्या शिंदे, सचिन सावळेकरी, सुरेश पानारी, प्रवीण भोसले, विश्वास डोंगरे, मनीषा पाटील, सुरेश गुरव, विनायक हुपरे आदी उपस्थित होते.