निपाणी ः अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी ः अपघात
निपाणी ः अपघात

निपाणी ः अपघात

sakal_logo
By

बेळगाव व कोल्हापूर आवृत्तीसाठी

६३८२६
रोहित आर्दाळकर

निपाणीजवळ अपघातात
कौलगेचा तरुण ठार
निपाणी, ता. २१ ः येथील राष्ट्रीय महामार्गावरील गोल्डलीफ हॉटेलनजीक झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) घडली. रोहित चंद्रकांत आर्दाळकर (वय२५, रा. कौलगे. ता. गडहिंग्लज) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस स्थानकात झाली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, रोहित आज (ता. २१) सकाळी मोटारसायकलवरून कोल्हापूरला रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाइकांकडे गेला होता. सायंकाळी गावाकडे जाताना येथील हॉटेल गोल्डलीफजवळ आल्यावर मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. घटनेत रोहितला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रोहितच्या मागे आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. रोहित अविवाहित असून, तो वाहतूक व्यवसाय करीत होता.