खंडणीबहाद्दराची जामिनानंतर मिरवणूक गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीबहाद्दराची जामिनानंतर मिरवणूक गुन्हा दाखल
खंडणीबहाद्दराची जामिनानंतर मिरवणूक गुन्हा दाखल

खंडणीबहाद्दराची जामिनानंतर मिरवणूक गुन्हा दाखल

sakal_logo
By

64122
इचलकरंजीतील खंडणीबहाद्दराच्या
शक्तिप्रदर्शनप्रकरणी पाच अटक

काराग्रहातील जामीनानंतर कृत्य ः अजित नाईकासह २८ जणांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : इचलकरंजीतील खंडणीबहाद्दर अजित नाईकाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने समर्थकांसह कळंबा मध्यवर्ती कारागृहाबाहेरून पुणे-बंगळूर महामार्गाकडे जाताना शक्तिप्रदर्शन करत उन्मादतेचे प्रदर्शन केले. तसेच, दहशत माजविल्याबद्दल त्याचासह ३२ समर्थकांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी पाचजणांना अटक केली.
अटक केलेल्यांची नावे अशी; शुभम कुमार कदम (वय २३, रा. कसबा आळते, ता. हातकणंगले), सूरज महादेव पाटील (२६, रा. गणेश नगर, इचलकरंजी), अनिकेत सावंतराव नरळे (२१, रा. गणेश नगर, इचलकरंजी), साजिद ऊर्फ टिपू दस्तगीर नाईक (३० रा. शाहूनगर, बेघर वसाहत, कागल), गणेश सुरेश आडेकर (२६, रा. गणेशनगर, इचलकरंजी) याशिवाय अजित आप्पासाहेब नाईक, अनिकेत पाटील, सागर पाटील, आकाश नाईक, अक्षय कदम, संकेत भातमारे, तौहिद (पूर्ण नाव नाही), पिंक्या चव्हाण, सोमनाथ आगलावे, स्वप्नील उबाळे, अक्षय कांबळे, सचिन शिंदे, अक्षय कदम, किशोर जाधव, सागर सावंत, अविनाश टेकाळे, शेखर पन्हाळकर, सागर पन्हाळकर, किरण कवाळे, निखिल परदेशी, राकेश पाटील, सौरभ घाटमोडे, प्रकाश पोवार, अलक्या कोरवी, अनिल अन्नदाते, आसीफ खताल, दयासागर हेगड यांच्यासह सुमारे ३०-३५ तरुणांवर गुन्हे दाखल असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, अजित आप्पासाहेब नाईक (रा. गणेशनगर, इचलकरंजी) यांच्यावर खंडणी आणि मोका अंतर्गत कारवाई झाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर तो न्यायालयीन बंदी म्हणून कळंबा कारागृहात होता. त्याला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. त्याची १७ नोव्हेंबरला सायंकाळी कारागृहातून सुटका झाली. पूर्वग्रहदूषित होऊन त्याच्यासह गॅंग मधील ३०-३५ समर्थकांसह चार मोटारी आणि सुमारे २०-२५ दुचाकीवरून येऊन शक्तिप्रदर्शन केले. कारागृहासमोरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पुणे-बंगळूरवरून तो कागलकडे जात होता. त्याने सहकार्यासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने हातवारे, घोषणाबाजी, आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून रहदारीस अडथळा निर्माण केला. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस आसिफ महंमद कलायगार यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.