सव्वा चार तोळ्यांचे दागिणे परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वा चार तोळ्यांचे दागिणे परत
सव्वा चार तोळ्यांचे दागिणे परत

सव्वा चार तोळ्यांचे दागिणे परत

sakal_logo
By

64115
सव्वा चार तोळ्यांचे दागिने परत
कोल्हापूर ः गुजरी परिसरात सव्वा चार तोळे सोन्याची दोन मणीमंगळसूत्रे असलेली हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत करण्यात आली. याबद्दल हेमंत सपन दुलाई (रा. कासार गल्ली) यांचा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सत्कार झाला.
पोलिसांनी सांगितले, की मंगेश विलास उबाळे आणि त्याची आई वैशाली हे दोघे १३ नोव्हेंबरला खरेदीसाठी बाजारात आले होते. तेव्हा गुजरी परिसरात त्यांची तीन तोळे आणि सव्वा तोळा असे सव्वाचार तोळ्यांची दोन मणीमंगळसूत्रे असलेली पर्स हरवली होती. त्यांनी याबाबतची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली होती. काही दिवसांनंतर कासार गल्ली येथील विमल प्लाझा येथे ही पर्स दुलाई यांना मिळाली. त्यांनी हे दागिने असलेली पर्स पोलिस ठाण्यात जमा केली. सर्व खात्री करून पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पोलिस ठाण्यात दुलाई यांचा सत्कार केला.