सामाजिक उपक्रमांनी होणार क्षीरसागरांचा वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक उपक्रमांनी होणार
क्षीरसागरांचा वाढदिवस
सामाजिक उपक्रमांनी होणार क्षीरसागरांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी होणार क्षीरसागरांचा वाढदिवस

sakal_logo
By

सामाजिक उपक्रमांनी होणार
क्षीरसागरांचा वाढदिवस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२२ ः राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचे नियोजन शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले आहे.
गंगावेश येथील शिवसेनेच्या शाखेतर्फे बुधवारी (ता.२३) दुधाळी मैदान येथे श्‍वान पळवण्याची स्पर्धा आहे. जोशी गल्लीतील शाखेने रेकॉर्ड डान्स स्पर्धा भरवली आहे. जूना बुधवार पेठेतील शिवसैनिकांनी महिलांसाठी रांगोळी व संगीत खर्ची स्पर्धा व सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आहेत. तर शनिवार पेठ यांच्यातर्फे खोलखंडोबा हॉल येथे कॅरम स्पर्धा होणार आहे. यादवनगरातील शाखेने आरोग्य शिबीर, शनिवारी (ता. २६) नंगीवली तालीमतर्फे गडकरी हॉल येथे पोलीस भरती प्रशिक्षण पूर्व मार्गदर्शन शिबीर आहे. रविवारी (ता.२७) राजारामपुरी विभागातर्फे स्केटिंग स्पर्धा, लाड चौक मंगळवार पेठ यांच्यातर्फे बकऱ्यांच्या टकरी, उत्तरेश्वर पेठतर्फे आरोग्य शिबीर आहे. या शिवाय अंध शाळेतील मुलांना स्नेहभोजन, गोमाता पूजन, सी.पी.आर. रुग्णालयात फळेवाटप, चादर व भोजन वाटप, मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप होईल. शिवाजी पेठ शाखेतर्फे रंकाळा तलाव येथे पतंग, आकाशदिवे स्पर्धा, ‘कोण होणार वल्डकप विजेता’, लकी ड्रॉ स्पर्धा आहेत. शिवाय अपंग व्यक्तींना सायकल प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेने प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.