Gag2301_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag2301_txt.txt
Gag2301_txt.txt

Gag2301_txt.txt

sakal_logo
By

Gag२३०१००१

64123
कोल्हापूर : नॅचरोपॅथी कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. परेश वाडकर. सोबत डॉ. प्रकाश शिंदे, अशोक पोतनीस, सुलभा गायकवाड व इतर.

गगनबावडा येथे
नॅचरोपॅथी कार्यशाळा
गगनबावडा, ता. २३ ः भारतीय निसर्गोपचार संस्था आयुष मंत्रालय, पुणे व आत्मसहाय्य सामाजिक संस्था शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये नॅचरोपॅथी कार्यशाळा झाली. उद्घाटन होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हस्ते रोपांना पाणी घालून झाले.
डॉ. परेश वाडकर प्रमुख वक्ते होते. ते म्हणाले, ‘माणसाचे शरीर पंचतत्त्वाने म्हणजे आकाश, वायू, सूर्य म्हणजेच अग्नी, जल व पृथ्वी यांनी बनले आहे. याचे समतोल प्रमाण ठेवले की प्रकृती चांगली राहते; अन्यथा बिघडते म्हणून उत्तम आरोग्यासाठी निसर्गाशी जवळीक करा.’ प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख आत्मसहाय्य संस्था, कोल्हापूरच्या कोषाध्यक्ष दीप्ती कदम यांनी करून दिली. स्वागत अध्यक्षा मनीषा जाधव व सचिव अशोक पोतनीस यांनी केले. संस्थेच्या कार्याचा आढावा मनीषा जाधव यांनी घेतला. अशोक पोतनीस यांनी ‘विद्यार्थी व पालकांनी प्रतिकारकशक्ती वाढविण्याचा संदेश दिला. ''चेहरा ठेवा हसरा भय सारे विसरा'' घोषवाक्य असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, अशोक पोतनीस यांनी आभार मानले.