जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

64125
जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ९६ उपकरणांची मांडणी केली होती. दोन गटांत ही मांडणी केली होती. लहान गटात हर्ष पट्टणशेट्टी, सुजित राणगे, गिरिजा पराव, स्फूर्ती भादवणकर यांनी अनुक्रमे पहिले तीन, तर सृष्टी पाटील व समर्थ शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. मोठ्या गटात सक्षम लब्यागोळ, दर्शन मोरे, शार्दुल मोहिते यांनी अनुक्रमे पहिले तीन, तर भूषण मगदूम, रिया देवरकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. रवींद्र जांबोटकर, वहिदा मुल्ला यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य विजय चौगुले, आर. बी. लोखंडे, एस. बी. अनावरे, एम. एस. दड्डी, व्ही. एस. शेडगे आदी उपस्थित होते.
--------------------------------
64126
घाळीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ओंकार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. केंद्र संयोजक प्रा. प्रवीण माळी यांनी स्वागत केले. बीए, बीकॉम, बीलिब परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सुनीता गावडे, सागर खाडे, मारुती कोलुनकर, ज्ञानेश्वर पाटील, योगिता सोळांकुरे या विद्यार्थ्यांसह प्राचार्य मंगलकुमार पाटील, डॉ. चव्हाण यांची भाषणे झाली. प्रा. सुनील देसाई, केंद्र सहायक सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते. प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजेंद्र सावेकर यांनी आभार मानले.
------------------------------
नौकुड बससेवा सुरु करण्याची मागणी
गडहिंग्लज : नौकुड (ता. गडहिंग्लज) येथून शाळा-महाविद्यालयासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गडहिंग्लजला येतात. त्यामुळे सकाळी सव्वासहाला बसर्गे बसफेरीला विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यामुळे चिंचेवाडीला जाणारी बस पुढे नौकुडपर्यंत सोडावी. तसेच सायंकाळी चार वाजता गडहिंग्लजहून नौकुडपर्यंत येणारी बस पुढे येणेचवंडी फाट्यापर्यंत सोडावी. यामुळे नंदनवाड येथे शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे या बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत एसटी महामंडळाच्या आगारप्रमुखांकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन दिले आहे.