प्रकल्पग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
प्रकल्पग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

प्रकल्पग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

sakal_logo
By

जिल्हाधिकारी कार्यालयावर
श्रमिक मुक्ती दलाचा धडक मोर्चा

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी

कोल्हापूर, ता. २३ : कोयना धरणग्रस्तांचे ६२ वर्षांपासून प्रलंबित असलेले पुनर्वसन झाले पाहिजे तसेच कायद्याशी विसंगत व धरणग्रस्तांना उद्‍ध्वस्त करणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज श्रमिक मुक्ती दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. डॉ. भारत पाटणकर यांच्या आदेशाने काढलेल्या या मोर्चात रद्द करा...रद्द करा, शासन निर्णय रद्द करा, झाले पाहिजे, झाले पाहिजे, पुनर्वसन झाले पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेले.
राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र असलेल्या बाधित प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या पर्यायी जमिनीच्या तरतुदी प्रकल्पग्रस्तांना उद्‍ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्या कायद्याशी सुसंगत नाहीत. त्यामुळे १४ जून २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे. प्रकल्पग्रस्त व्यक्तींना भोगवटादार वर्ग २ मधील पर्यायी जमिनीचे वाटप केल्याच्या तारखेपासून दहा वर्षांनंतर ही जमीन वर्ग १ मध्ये केली जाणार आहे. यामध्ये शासनाने चुकीचा अर्थ काढला आहे. त्यानुसार तसा आदेश दिला; मात्र या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. हा निर्णय रद्द करून प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी शासकीय पातळीवर निर्णय होणे अपेक्षित आहे. वारंवार मागणी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यातून प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. यावेळी संपत देसाई, संतोष गोटल, डी. के. बोडके आदी उपस्थित होते.