पाणी नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला
पाणी नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला

पाणी नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला

sakal_logo
By

पाणी नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला
अहवालानंतर निर्णय; पंचगंगा नदीतून उपसा बंद
इचलकरंजी, ता. २३ ः पंचगंगा नदीतील पाण्याचे नमुने आज तपासणीसाठी कोल्हापूर प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीतून उपसा मंगळवारी बंद केला आहे. प्रदूषित पाण्यामुळे महापालिका प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली आहे. नदीचा प्रवाह थांबला असून, पाण्याची पातळी खालावली आहे. यामध्ये सांडपाणी मिसळत असल्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले असून पाण्याला दर्प येत आहे. त्यामुळे नदी प्रवाहित करण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केले आहेत. पाणी उपसा बंद केल्यामुळे दररोज ९ एमएलडी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.