दिव्यांग मुलांच्या जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग मुलांच्या जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा
दिव्यांग मुलांच्या जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा

दिव्यांग मुलांच्या जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा

sakal_logo
By

दिव्यांग मुलांच्या शनिवारी
जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा

कोल्‍हापूर, ता. २३ : जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभाग, रोटरी क्‍लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिव्यांग मुलांच्या जिल्‍हास्‍तरीय क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन केले आहे. उद्‌घाटन शनिवारी (ता. २६) सकाळी ९ वाजता पोलिस ग्राउंड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, रोटरीचे अध्यक्ष संजय साळोखे, सचिव सागर बकरे, इव्‍हेन्‍ट चेअरमन अजित जाधव उपस्‍थित राहणार आहेत. यावेळी पॅराऑलम्‍पिक जलतरणपटू स्‍वप्‍नील पाटील, सुबीया मुल्‍लाणी, ताहीर मुल्‍लाणी, शुभम पाटील यांचा सत्‍कार करण्यात येणार आहे.