अधिकारी कर्मचारी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारी कर्मचारी निवेदन
अधिकारी कर्मचारी निवेदन

अधिकारी कर्मचारी निवेदन

sakal_logo
By

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतनाबाबत निवेदन
कोल्हापूर, ता. २३ ः महापालिकेत २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कपात होणारी रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (एनपीएस) वर्ग करण्याची मागणी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, ‘लेखापरीक्षकांनी तपासणी अहवालात ही योजना महापालिकेसाठी राबवण्याची शिफारस केली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग केली आहे. शासनाकडून याबाबतचा आदेश काढला आहे. नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना एनपीएस अंमलबजावणीचा स्वतंत्र आदेश काढूनही महानगरपालिकेच्या २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची कपात होणारी रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत जमा केली जात नाही. यात रक्कम गुंतविण्यास जितका उशीर होईल तितका परतावा कमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचे नुकसान होऊन मानसिक खच्चीकरण झाले आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे त्वरीत एनपीएसमध्ये खाते काढून कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान टाळावे.