महाडिक - पोलिस स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडिक - पोलिस स्नेहमेळावा
महाडिक - पोलिस स्नेहमेळावा

महाडिक - पोलिस स्नेहमेळावा

sakal_logo
By

६४३०९

महिला पोलिस अधिकारी,
कर्मचारी स्नेहमेळावा उत्साहात
कोल्हापूर, ता. २३ ः धनंजय महाडिक युवाशक्ती, भागीरथी महिला संस्था आणि पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी स्नेहमेळावा झाला. पोलिस क्रीडांगणानजीक अलंकार हॉलमध्ये आयोजित ‘होम मिनिस्टर'' कार्यक्रमाचा आनंद त्यांनी लुटला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गृहपोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, डॉ. अनुराधा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन झाले. खासदार धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक प्रमुख उपस्थित होते.
कामाच्या ताणतणावातून मनोरंजनाच्या विश्‍वात महिला, अधिकारी- कर्मचारी आणि पोलिसांच्या कुटुंबीयांना नेण्याचे काम कौतुकास्पद आहे. दरवर्षी असे विविध उपक्रम झाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, असा विश्‍वास डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केला. महिला पोलिसांना नोकरीसह कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील पार पाडाव्या लागतात. त्यांची शक्ती याच कामात खर्च होते. त्यासाठीच मनोरंजनात्मक उपक्रमाचे आयोजन केले. यापुढे त्यांच्या आरोग्यासाठी शिबिरे घेण्याचा मानस असल्याचे अरूंधती महाडिक यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गृहपोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत दीपाली पाटील यांना मानाची पैठणी, तर श्रध्दा आंबले यांना सोन्याची नथ, सोनम शियेकर यांना चांदीचा करंडा, अनिता पाटील, मेघा पाटील, सुजाता शिंदे यांना चांदीचं नाणे भेट देण्यात आले. दत्ताजीराव माने सराफ पेढीच्या जयश्री माने आणि वनिता सांस्कृतिक मंडळाच्या डॉ. अनुराधा सामंत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.