राणे समर्थकांनाचा केसरकरांकडून ठेके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणे समर्थकांनाचा 
केसरकरांकडून ठेके
राणे समर्थकांनाचा केसरकरांकडून ठेके

राणे समर्थकांनाचा केसरकरांकडून ठेके

sakal_logo
By

राणे समर्थकांनाच
केसरकरांकडून ठेके
सुषमा अंधारे; दहशतवादाचा केवळ बागुलबुवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुसता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून सिंधुदुर्गवासीयांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले; तेव्हा सर्वात जास्त ठेके राणे समर्थकांनाच दिले, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे केला. ते जरी राणेंचा दहशतवाद संपला म्हणून सांगत असले, तरी तो सत्तेसाठी असून, दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ, हेच यामागचे त्यांचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

त्या म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता तिथेच आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. मंत्री केसरकर यांचा छुपा दहशतवाद सर्वाना कळून चुकला आहे. आतापर्यंत रोजगाराची अनेक आश्वासने दिली; पण प्रत्यक्षात काथ्या कारखाना, चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले, ते सांगू शकले नाहीत. आता येथील जनता केसरकर यांच्या भुलभुलैय्याला फसणारी नाही तर योग्य उत्तर देणारी आहे. दहशतवाद म्हणून ओरड मारून मते घेतली आणि आता ते राणेंचा दहशतवाद संपला म्हणतात, मग हा दहशतवाद सत्तेसाठी संपला म्हणायचे का? म्हणजे सत्तेसाठी दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ असेच यांचे धोरण आहे. केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेक ठेके हे राणे समर्थकांनाच देत असत. मग दहशतवाद कसा म्हणायचा"
त्या म्हणाल्या, ‘‘जे ४० आमदार सोडून गेले आहेत, त्यातील अनेकजण आमच्या संर्पकात आहेत. त्यात मंत्री केसरकर मात्र नाहीत. कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही थांबणार नसून भाजपमध्ये जाणार आहेत.’’

राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधी मोट
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यामागे मुंबई महापालिका एवढे छोटे कारण नसून ते राष्ट्रीय राजकारणात सर्व युवा चेहरे एकत्र येऊन भाजपविरोधी मोट बांधणे गरजेचे आहे. देशात जे राजकारण सुरू आहे, ते थांबवण्याची गरज असून, सगळे युवा चेहरे एकत्र आल्यास नक्कीच त्यात बदल होईल, असे अंधारे म्हणाल्या.

कर्नाटकच्या निर्णयामागे भाजपची कुटील नीती
कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगितला. तो दावा म्हणजे भाजपच्या राजकारणाचा कुटील डाव असून, हे कोठेतरी थांबले पाहिजे. जे ४० जण शिवसेनेतून गेले आहेत, ते गप्प का बसले आहेत, ते दिल्लीतील अमराठी नेत्यांसमोर गप्प का बसतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी केला.