गटसचिव बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटसचिव बैठक
गटसचिव बैठक

गटसचिव बैठक

sakal_logo
By

गट सचिवांच्या प्रलंबित
मागण्यांबाबत समितीचे आदेश

सहकारमंत्र्यांसोबत मुंबईतील बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः राज्यातील गट सचिवांच्या विविध मागण्यांबाबत आज राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांचे अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यावेळी गट सचिवांच्या मागण्यांबाबत समिती गठीत करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्यातील विकास सोसायट्यांमध्ये २००४ पासून सचिवांची भरती केली नाही. त्यामुळे सुमारे १२ हजार पाचशे गट सचिवांची आवश्यकता असताना केवळ साडेपाच हजार गट सचिव कार्यरत आहेत. एका सचिववाकडे दोन-दोन, तीन-तीन सोसायट्यांचे कारभार सुरू असून, यामुळे गट सचिवांच्या सेवा व वेतनाचे सर्व कायदे व नियम मोडीत काढण्यात आले. यामुळे राज्यातील गट सचिवांनी त्यांच्या विविध मागण्या सादर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. सहकारमंत्री सावे यांनी लवकरच पाच सदस्यीय समितीची स्थापना केली जाईल. यात सहकार विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी व तीन गटसचिवांचे प्रतिनिधी असतील. याबाबत सहकार विभागाने महिन्यात अहवाल सादर करावा. तसेच हिवाळी अधिवेशनानंतर जानेवारीच्या पाहिल्या आठवड्यात वित्त विभागाच्या अभिप्रायासह मंत्रिमंडळ बैठकीसमोर समितीचा प्रस्ताव सादर करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
खनिकर्म मंत्री दादा भुसे, रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सहकार विभागाचे अपरमुख्य सचिव अनुपकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सचिव प्रशांत खेडकर, जिल्हा उपनिबंधक अभिजित पाटील, कक्ष अधिकारी राहुल शिंदे, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम आदी उपस्थित होते.