न्यू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
न्यू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

न्यू कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

sakal_logo
By

न्यू कॉलेजमध्ये उद्या राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर : स्वातंत्र्य, समता, बंधुताधिष्ठित समाजनिर्मितीतील महाविद्यालयीन युवकांची जागरूक भूमिका व मतदार जाणीवजागृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंच व्यासपीठाची उभारणी केली आहे. लोकशाही समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या ठरत असतात. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण वर्गामध्ये मतदान, निवडणूकसंदर्भात जागृती घडवून आणण्यासाठी शुक्रवारी (ता. २५) न्यू कॉलेज येथे ‘महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंचाची लोकशाही मूल्यांच्या रूजवणुकीतील भूमिका’ यावर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि न्यू कॉलेज राज्यशास्त्र विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकरी राहुल रेखावार, उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयीन युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी पत्रकाद्वारे केले.