कोवाड-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-क्राईम
कोवाड-क्राईम

कोवाड-क्राईम

sakal_logo
By

ट्रॅक्टरच्या कारणावरुन झालेल्या
वादावादीत तीघेजण जखमी

परस्परविरोधी तक्रारी; सातजणांवर गुन्हा दाखल

कोवाड, ता. २३ ः मलतवाडी (ता. चंदगड) येथे शेतातील रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या कारणावरुन झालेल्या वादावादीत तीघेजण जखमी झाले. दोघानीही चंदगड पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे पोलिसात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास माळाकडील शेतात ही घटना घडली.
याप्रकरणी एकनाथ आण्णाप्पा पाटील यांच्या फिर्यादीनुसार नारायण रामू पाटील, निलेश नारायण पाटील, लक्ष्मी नारायण पाटील, मारुती सटूप्पा पाटील, सटुप्पा मारुती पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तर निलेश नारायण पाटील यांच्या फिर्यादिवरुन एकनाथ आण्णाप्पा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, एकनाथ पाटील हे शेतात ट्रॅक्टर उभे करुन गवत कापत असताना निलेश पाटील यांनी त्याना अश्लिल शिवीगाळ करुन ट्रॅक्टर बाजूला काढण्यासाठी सांगितले. त्याला विरोध केला म्हणून एकनाथ पाटील यांना मारण्यासाठी नारायण रामू पाटील, निलेश नारायण पाटील, लक्ष्मी नारायण पाटील, मारुती सटूप्पा पाटील, सटूप्पा मारुती पाटील यांनी पकडले. त्यावेळी निलेश पाटील यांनी लोखंडी टॉमीने पाटील यांच्या पायावर मारल्याचे फिर्यादीत एकनाथ पाटील यांनी म्हटले आहे.
निलेश नारायण पाटील यांनी एकनाथ पाटील यांना पंधरादिवसाच्या वायद्याने 1लाख रुपये उसने दिले होते. ते परत मागीतले म्हणून त्याचा राग मनात धरुन त्यांनी रस्त्यात ट्रॅक्टर उभा करुन रस्ता अडविला. रस्त्यावरुन ऊस सोडणार नसल्याचे सांगून ट्रॅक्टर बाजूला घेण्याला नकार दिल्याने दोघांच्यात वादावादी झाली. त्यामध्ये एकनाथ पाटील यांनी लाथाबुक्यानी मारहान केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नरसू मायाप्पा पाटील यांनाही लोखंडी टॉमीने मारहान केल्याचे निलेश पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.