फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

विश्वकरंडक फुटबॉलॉ

दवडलेली संधी
कॅनडाला महागात
बेल्जियमची १-० ने बाजी

अहमद बिल अली स्टेडियम (कतार) ः पेनल्टी स्ट्रोकची दवडलेली संधी आणि आक्रमणातील विस्कळीतपणा यामुळे आज कॅनडाला बेल्जियमकडून पराभूत व्हावे लागले. ‘फ’ गटातील या सामन्यात बेल्जियमने वर्चस्व राखत सामना १-० अशा गोल फरकाने जिंकला.
पूर्वार्धात बेल्जियमचा स्ट्रायकर मिची बत्शुआयीने बेल्जियमसाठी गोल केला. त्याने पूर्वार्ध संपण्याच्या काठावर म्हणजे ४४ व्या मिनिटाला गोल करताना संघाला १-० असे आघाडीवर नेले. लॉंग पासवर झालेला हा गोल अवघ्या दोन फटक्यांचा होता. दुर्दैवी ठरला तो कॅनडाचा संघ. त्यांना सामन्याच्या अकराव्या मिनिटाला पेनल्टी मिळाली होती; पण ही सुवर्णसंधी वाया गेली. बेल्जियमच्या यानिक कॅरास्कोने ‘डी’मध्ये चेंडू हाताळल्यानंतर पंचांनी कॅनडाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केली. त्यांच्या अल्फोन्सो डेव्हिसने खराब किक मारली. बेल्जियमच्या गोलरक्षक थिबॉट कोर्टोईसने उजवीकडे झेपावत चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला; पण तो त्याच्या हाताला तटून पुन्हा डेव्हिसच्या दिशेने आला; मात्र त्याचा दुसरा फटकाही जाळ्यावरून गेला. पूर्वार्धात कॅनडाने १४ वेळा बेल्जियमच्या गोलपोस्टवर धडक दिली. पैकी गोल दोन अचूक होते; पण त्याचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. दुसरीकडे बेल्जियमचे चारपैकी दोन प्रयत्न गोल पोस्टच्या दिशेने होते.
उत्तरार्धातही बेल्जियमचे वर्चस्व दिसून आले. त्यांनी आघाडी कशी कायम राहील, अशा दृष्टिकोनातून खेळ करताना कॅनडाच्या आक्रमण फळीला फारशी संधी मिळणार नाही, याची दक्षता घेतली. सामन्यात एकूण पाच खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आले.