अतिक्रमणधारकांना दिलासा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणधारकांना दिलासा द्या
अतिक्रमणधारकांना दिलासा द्या

अतिक्रमणधारकांना दिलासा द्या

sakal_logo
By

64366
----------
अतिक्रमणधारकांना दिलासा द्या
सिद्धार्थनगर झोपडपट्टी संघटनेतर्फे मागणी; प्रांत कार्यालयावर मोर्चा
इचलकरंजी, ता.२४ : उच्च न्यायालयाने गायरान जागेमधील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्याने कबनूर येथील ३५० हून अधिक नागरिकांचा संसार उघड्यावर पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागुन अतिक्रमणधारकांना न्याय व दिलासा द्यावा, या मागणीसाठी सिद्धार्थनगर झोपडपट्टी संघटनेच्यावतीने सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढला. मागणीचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले.
निदर्शने करीत अतिक्रमण नियमित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनात कबनूर येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना अतिक्रमण हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबतच्या नोटीसा महसूल खात्यामार्फत वाटप केल्या आहेत. सिद्धार्थनगर झोपडपट्टी ही ४० ते ४५ वर्षे स्थायिक आहे. या झोपडपटीमध्ये सुमारे ३५० घरे व लोकसंख्या २ हजार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आमची कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत. सरकारने मागासवर्गीय, गोरगरीब जनतेला न्याय देण्याच विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामधून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, असे नमूद केले आहे.
मोर्चामध्ये पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, काँग्रेस नेते राहुल खंजीरे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, पंचायत समिती सदस्या महानंदा पाटील, प्रमोद पाटील, बबन केटकाळे, सैफ मुजावर, भैय्या जाधव, सुधीर लिगाडे, समीर जमादार, वैशाली कदम आदी उपस्थित होते.
-----------
अतिक्रमण निष्कसित न करण्याचा ठराव
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणधारकांना नोटीस लागू करण्याचे काम सुरू आहे. मात्र ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये अतिक्रमण निष्कसित करण्यात येऊ नये. याबाबत न्यालयात दाद मागण्याबाबत ठराव झाला आहे. हा निर्णय शासनस्तरावर कळवावा व कार्यवाहीस स्थगित व्हावी, असे निवेदन व ठराव कबनूर ग्रामपंचायतीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयात दिला.