अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका
अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका

अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका

sakal_logo
By

gad242.jpg
64414
गडहिंग्लज : गायरानातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करू नका, या मागणीचे निवेदन बाबासाहेब वाघमोडे यांना देताना हसन मुश्रीफ. शेजारी स्वरुप खारगे, शरद मगर, दिनेश पारगे आदी.
----------------------------------------
अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका
हसन मुश्रीफ यांची प्रशासनाला सूचना : गायरानातील घरकुलधारकांतर्फे दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : गायरानातील अतिक्रमणांबाबत आमदार हसन मुश्रीफ यांनी आज प्रशासनाची बैठक घेतली. अतिक्रमणे हटविण्याची गडबड करु नका, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तहसील कार्यालयात ही बैठक झाली. दरम्यान, बैठकीनंतर गडहिंग्लज तालुक्यातील गायरानातील घरकुलधारकांतर्फे श्री. मुश्रीफ यांनी निवेदन दिले.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘आपण ग्रामविकास मंत्री पदावर असताना महाराष्ट्रभर महाआवास योजना प्रभावीपणे राबविली. ज्या बेघरांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, अशा बेघरांना गायरानातील ५००चौरस फूट जागा देण्याच्या सूचना त्याकाळात सरकारने प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे असे घरकुलधारक या कारवाईमुळे कुठे जातील, हा प्रश्न आहे.’
बैठकीला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरुप खारगे, प्रा. किसनराव कुराडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी नगरसेवक हरूण सय्यद, रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, महेश सलवादे, अमर मांगले आदी उपस्थित होते.
-----------------
...ते बेघरच होतील
श्री. मुश्रीफ म्हणाले,""ज्यांची जागा घेऊन घरे बांधण्याची कुवत नाही, बहुतांशी अशा लोकांनीच गायरानात अतिक्रमण करून घरे बांधलेली आहेत. त्यांना निवारा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारीच आहे. सरसकट कारवाई केली तर ते बेघरच होतील.''''