लक्ष्मी मंदिर मार्गावर भरला फळांचा बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी मंदिर मार्गावर भरला फळांचा बाजार
लक्ष्मी मंदिर मार्गावर भरला फळांचा बाजार

लक्ष्मी मंदिर मार्गावर भरला फळांचा बाजार

sakal_logo
By

लक्ष्मी मंदिर मार्गावर भरला फळांचा बाजार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : गुरुवार असुनही लक्ष्मी मंदिर मार्गावर आज आठवडा बाजाराचे वातावरण होते. निमित्त होते आजपासून सुरु होणाऱ्या मार्गशिर्ष लक्ष्मीपूजनाचे.
फळ आणि फुले खरेदीसाठी दिवसभर या मार्गावर ग्राहकांची वर्दळ होती. मागणीमुळे फळे आणि फुलांचे दर वधारले होते. सकाळपासूनच विक्रेत्यांनी लक्ष्मी मंदिर मार्गावर ठिय्या मांडला होता. फळे आणि फुलांच्या विक्रेत्यांमुळे दिवसभर या मार्गावर आठवडा बाजाराचे वातावरण होते. विशेषतः महिलांची अधिक वर्दळ होती. आजचा मार्गशिर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार होता. त्यामुळेच फळ, फुले विक्रेत्यांनी व्यापार लक्षात घेऊन कालपासून नियोजन केले होते. केळी, सफऱचंद, पेरू, डाळींब, संत्री, बोरे आदींची खरेदीसाठी गर्दी होती.
पुजेला पाच फळांची मागणी होती. त्यासाठी पाच फळांचा ढीग तयार ठेवला होता. केळी ४० ते ६० रुपये डझन होती. इतर फळांचे किलोचे दर सरासरी शंभर रुपयांवर पोहोचले होते. फुलांनाही मागणी होती. झेंडू, शेवंतीचे दर तेजीत होते. झेंडू, शेवंतीचा किलोचा दर ६० ते ८० रुपयापर्यंत होता. लक्ष्मीच्या मुखवट्यांना मागणी होती. दुपारच्या सत्रात उन्हामुळे थोडी वर्दळ कमी झाली. पण, सायंकाळच्या सत्रात पुन्हा गर्दी वाढलेली दिसली. फळ आणि फुलबाजारात दिवसभरात मोठी उलाढाल झाली.