गड-गोडसाखर अध्यक्ष निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-गोडसाखर अध्यक्ष निवड
गड-गोडसाखर अध्यक्ष निवड

गड-गोडसाखर अध्यक्ष निवड

sakal_logo
By

gad247.jpg 64473 डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण

''गोडसाखर'' अध्यक्षपदी
डॉ. प्रकाश शहापूरकर

बिनविरोध निवडी : उपाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण
गडहिंग्लज, ता. 24 : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) अध्यक्षपदी डॉ. प्रकाश शहापूरकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. दरम्यान, डॉ. शहापूरकर यांना तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदी तर श्री. चव्हाण यांना चौथ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे.
''गोडसाखर''च्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ व डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्व 19 जागांवर विजय मिळविला. आघाडीची रचना करतानाच अध्यक्षपदी डॉ. शहापूरकर यांना तर उपाध्यक्षपदी श्री. चव्हाण यांना संधी देण्याची घोषणा श्री. मुश्रीफ यांनी केली होती. त्यामुळे आजच्या निवडींची औपचारिकता बाकी होती.
या पदांसाठी अनुक्रमे डॉ. शहापूरकर व श्री. चव्हाण यांचेच अर्ज आल्याने श्री. जगताप यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. डॉ. शहापूरकर यांना सतीश पाटील सूचक तर प्रकाश पताडे अनुमोदक आहेत. श्री. चव्हाण यांना विद्याधर गुरबे सूचक तर सदानंद हत्तरकी अनुमोदक आहेत. संचालक अॅड. दिग्विजय कुराडे, सोमनाथ पाटील, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील, अशोक मेंडुले, अक्षय पाटील, रवींद्र पाटील, भरमू जाधव, काशिनाथ कांबळे, अरुण गवळी, कविता पाटील, मंगल आरबोळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक झाली. सतीश पाटील, विद्याधर गुरबे, प्रकाश पताडे, सदानंद हत्तरकी यांनी एक-एक वर्षे उपाध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केल्याचे समजते.