नाईट लॅंडिंगसाठी दिड कोटींचा निधी मंजूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईट लॅंडिंगसाठी दिड कोटींचा निधी मंजूर करा
नाईट लॅंडिंगसाठी दिड कोटींचा निधी मंजूर करा

नाईट लॅंडिंगसाठी दिड कोटींचा निधी मंजूर करा

sakal_logo
By

नाईट लॅंडिंगसाठी दिड कोटी
निधी मंजूर कराः केसरकर

जिल्हाधिकारी रेखावार यांना सूचना

कोल्हापूर, ता. २४ : विमानतळाचे नाईट टेकऑप यशस्वीपणे सुरु झाले आहे. त्यानुसार नाईट लॅंडिंगची व्यवस्था दर्जेदार झाली पाहिजे, यासाठी जिल्हा नियोजनमधून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मजूर करा, अशा सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या. शिवाजी उद्यमनगर येथील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयाला पालकमंत्री केसरकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर विमानतळावर नाईट टेकऑप चांगल्या आणि यशस्वीरित्या होत आहे. त्यानुसार लॅंडिंगही झाले पाहिजे. यासाठी विमानतळावर आवश्‍यक असणारी अद्यावत यंत्रणा दिली पाहिजे. त्यामुळे सद्याचे नाईट लॅंडिंगमध्येही अद्यावत मशिनची गरज आहे आणि ती तत्काळ दिली पाहिजे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन विमानतळाला लागणारी आवश्‍यक यंत्र सामग्री दिली पाहिजे. नाईट लॅंडिंग सुरु झाल्यानंतर कोल्हापूरातील लोकांना दिवसभर मुंबईमधील कामे करुन पुन्हा रात्री कोल्हापूरला परत येता येईल. यामध्ये कोल्हापूरसह येथील उद्योजक किंवा इतर प्रवाशांचाही फायदा आहे. तसेच कोल्हापूरमध्ये मुंबई, पुणे, बेळगाव, हैद्राबाद, बेंगलूरूसह इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकांचा संपर्कही वाढणार आहे. त्यामुळे या यंत्रणेसाठी दिड कोटी रुपये तत्काळ मंजूर करुन संबंधित विभागला द्यावेत.’’ जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते.