तेंडलकर व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेंडलकर व्याख्यानमाला
तेंडलकर व्याख्यानमाला

तेंडलकर व्याख्यानमाला

sakal_logo
By

तात्यासोहब तेंडूलकर स्मृती
व्यख्यानमाला सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २४ ः अमृत महोत्सवी ब्राम्हण सभा करवीर (मंगलधाम) व महालक्ष्मी सहकारी बॅंक यांच्यातर्फे ‘तात्यासोहब तेंडूलकर स्मृती व्यख्यानमाला’ सोमवार (ता.२८) पासून सुरू होत आहे. उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत उद् घाटन होणार आहे. येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहेत. ४ डिसेंबरपर्यंतही व्‍याख्यानमाला चालणार आहे. अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर व ॲड. विवेक शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तात्यासाहेब तेंडूलकरांच्या स्मृती जपण्यासाठी महालक्ष्मी बॅंक, तेंडूलकर परिवार तसेच ब्राम्‍हण सभा मंगलधाम यांच्यातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी व्याख्यामाला आहे. यंदा २२ वे वर्ष आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला होता. समाजातील विविध घटकांकडून व्याख्यानामालेस मोठा प्रतिसाद लाभतो असेही श्री. डिग्रजकर यांनी सांगितले. नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये, अनुराधा गोसावी, वृक्षाली कुलकर्णी, प्रशांत कासार आदी उपस्थित होते.

चौकट
वक्ते व विषय असे
सोमवारी (ता. २८)- राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, विषय - ‘मोदी @ २१’
मंगळवारी (ता.२९)- प्रा. मधूकर पाटील, विषय - जगावे छत्रपती शिवरायांसारखे, लढावे छत्रपती शंभूराजांसारखे
बुधवार (ता. ३०)- वृत्तनिवेदक- दिपाली केळकर (मुंबई), विषय - हस्यसंजीवनी,
गुरूवारी (ता.१)- चंद्रकांत पागे (पुणे), विषय - विचारांची मानसशास्त्रीय स्पंदने आणि आरोग्य
शुक्रवार (ता. २)- एअरव्हाईस मार्शल किरण पळसुले, विषय - देशाच्या संरक्षणासाठी सामान्य मानसांची भूमिका
शनिवार (ता. ३)- अभिनेता विघ्नेश जोशी, विषय - मराठी असे आमची मायबोली
रविवार (ता. ४)- भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर, विषय ः पूर्वांचलमधील व हिंदू संस्कृती