शाहूपुरी व्यापारी असोसिएशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूपुरी व्यापारी असोसिएशन
शाहूपुरी व्यापारी असोसिएशन

शाहूपुरी व्यापारी असोसिएशन

sakal_logo
By

चांगला गूळ बनवावा,
चांगला भाव देऊ
गूळ व्यापाऱ्यांचे निवेदन; बाजार समितीकडे मागण्या
कोल्हापूर, ता. २४ ः शेतकऱ्यांकडून तयार केलेल्या गुळात साखर व रंगाचे मिश्रण असल्यास ते कोल्हापुरी ब्रॅण्डसाठी मारक ठरू शकते. शेतकरी गूळ बनवतो. तो विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनाकडून गुन्हे दाखल होत आहेत. व्यापारी धास्तावला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास व्यापाऱ्यांचे दुमत नाही. चांगल्या गुळाला चांगला दर दिला जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या गुळाची निर्मिती करावी. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, अशा मागणीचे निवेदन शाहूपुरी मर्चंन्ट असोसिएशनने जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीला आज दिले.
या निवेदनातील माहिती अशी की, कर्नाटकसह परराज्यातून गूळ आवक यार्डात विक्री करू नये, असे परिपत्रक बाजार समितीने नुकतेच काढले. कोणत्याही शेतकऱ्याला शेतीमाल कोठेही विकण्याची मुभा आहे. व्यापारही खुला आहे असे असताना बंदीचे परिपत्रक काढले, याचे स्पष्टीकरण समितीने करावे. गूळ सौदे दरावरून सौदे बंद होतात तेव्हा अडत्या व व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर दंगा केला जातो. व्यापाऱ्यांना अपशब्द वापरले जातात त्याला बाजार समितीने आवर घालावा. शेतकरी सध्या ३७०० रु. भाव द्यावा, या मागणीवर ठाम आहेत. मात्र गूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पुढील पार्टीकडून तेवढ्या दराच्या गुळाची मागणी नाही. राज्यात अन्य बाजारपेठेत गुळाचे भाव कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी दराप्रमाणे पार्टीकडून मागणी आल्यास व्यापारी गूळ खरेदी करण्यास तयार होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या गुळाची निर्मिती करावी. तेव्हा दरही आपोआप चांगला मिळेल. गुळाची आवक व सौदे सुरू ठेवावेत यासाठी बाजार समितीने लक्ष घालावे, असेही निवेदनात म्हटले आहे. असोसिएशनचे कार्यकारी मंडळ सदस्य विक्रम खाडे व अध्यक्ष नीलेश पटेल यांनी हे निवेदन दिले.