पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास

sakal_logo
By

पत्ता विचारण्याच्या
बहाण्याने पळविले
गंठण

कोल्हापूर ः पाचगाव परिसरातील बळवंतनगर रोडवर आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गाळ्यातील गंठण पळविले. याबाबत संजना किरण मुदगल (वय २१ रा. आपटे मळा, पाचगाव) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले, की बळवंतनगर रोडवर दुपारी सव्वाच्या सुमारास चालत जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहणा केला. पत्ता सांगण्यापूर्वीच मुदगल यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅमचे ३८ हजाराचे गंठण हिसडा मारून पळविले. त्यांनी ओरडा केला. मात्र, चोरटा सुसाट गेला. संजना यांनी घरी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.