शतपावली करताना अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शतपावली करताना अपघाती मृत्यू
शतपावली करताना अपघाती मृत्यू

शतपावली करताना अपघाती मृत्यू

sakal_logo
By

रिक्षाच्या धडकेत जखमी झालेल्याचा मृत्यू
कोल्हापूर ः शतपावली करताना महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी भारत दत्तोबा देसाई (वय ७०) यांना रिक्षाची धडक बसली. या अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. याप्रकरणी उदय हनुमंतराव इनामदार (वय ५५ रा. दादू चौगुले नगर, कळंबा परिसर) या रिक्षा चालकावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की रिलायन्स मॉल समोरील जुन्या लोखंड बाजारात भरत देसाई हे कुटुंबीयांसह राहतात. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते परिसरात शतपावली करतात. काल रात्री साडेदहाच्या सुमारास घरापासून लक्ष्मीपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. लक्ष्मीपुरी भाजी मंडईतून चांदणी चौकाच्या दिशेन जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाची त्यांना धडक बसली. त्यामुळे ते जखमी झाले.