ग्लोबल - मिरजकरला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लोबल - मिरजकरला अटक
ग्लोबल - मिरजकरला अटक

ग्लोबल - मिरजकरला अटक

sakal_logo
By

४१ लाख फसवणूक; एकास कोठडी
कोल्हापूर ः ग्लोबज ट्रेडींगमधील चौथा संशयित आरोपी सुशांत भानुदास मिरजकर याला अटक केली आहे. ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्ह्यात तो संशयित आरोपी आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई करून मिरजकरला आज न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ग्रोबज ट्रेडींगच्या ६ जणांवर यापूर्वीच ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील तपासात यापूर्वी तिघांना अटक झाली आहे. चौथा संशयीत सुशांत भानुदास मिरजकर (वय ३८ रा. लक्षतीर्थ वसाहत) याला आत्ता अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले तपास करत आहेत.