राजेश क्षीरसागर वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश क्षीरसागर वाढदिवस
राजेश क्षीरसागर वाढदिवस

राजेश क्षीरसागर वाढदिवस

sakal_logo
By

६४५२७

आमदार क्षीरसागर यांच्या
समाजकार्यास जनतेची साथ
मंत्री केसरकर : वाढदिनी विविध कार्यक्रम
कोल्हापूर, ता. २४ ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अनेक वर्षात केलेल्या समाजकार्यास कोल्हापूरवासियांनी मोलाची साथ दिली. क्षीरसागर यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कोल्हापूरवरील प्रेमाचा दाखला देते, असे गौरवोद्गार शालेय शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले. श्री. क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पत्रांचे वितरण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे बाल संकुलास दहा हजारांची मदत दिली. मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख मंदार पाटील आणि विपुल भंडारी यांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना शिवाजी पेठ विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धेची सोडत ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या हस्ते झाली. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी महापौर महादेवराव आडगुळे, देवस्थान समितीच्या माजी खजानीस वैशाली क्षीरसागर, ऋतूराज क्षीरसागर, दिशा क्षीरसागर, माजी महापौर सरिता मोरे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक श्रीमती पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर उपस्थित होते. दरम्यान, दिवसभर विविध शाखांतर्फे कार्यक्रम झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग त्री अनिल परब, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी दूरध्वनीवरून तर खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.