मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर

sakal_logo
By

मुख्यमंत्री शिंदे
आज जिल्ह्यात
कोल्हापूर, ता. २४ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (शुक्रवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते कऱ्हाडहून सायंकाळी चार वाजता मोटारीने शहरात येतील. पंचगंगा घाटावर आयोजित कणेरी मठावरील आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ते सहा वाजता नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या उद्‍घाटनाला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत जयसिंगपुरात शेतकरी मेळावा व जाहीर सभा होईल. तेथून ते कोल्हापूर विमानतळमार्गे रात्री आठ वाजता गोव्यातील कार्यक्रमासाठी जातील.