क्राईम दोन बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम दोन बातम्या
क्राईम दोन बातम्या

क्राईम दोन बातम्या

sakal_logo
By

भिवंडीच्या कैद्याचा मृत्यू
कोल्हापूर : खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या भिवंडीच्या कैद्याचा आज येथे मृत्यू झाला. अजितकुमार गिरजाशंकर मिश्रा ( वय६९) असे त्याचे नाव आहे. येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात 2012 मध्ये त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालया ने 23 जानेवारी 2020 ला त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अशक्तपणामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.