देवचंद कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवचंद कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश
देवचंद कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश

देवचंद कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश

sakal_logo
By

01743
नानीबाई चिखली : तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेले देवचंद कॉलेजचे खेळाडू.


देवचंद कॉलेजचे
कुस्ती स्पर्धेत यश
नानीबाई चिखली, ता. २४ : कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती आखाड्यामध्ये झाल्या. स्पर्धेत फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन या प्रकारात अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. यामध्ये ६० किलो वजनी गटात अर्जुन शंकर जाधव, ५७ किलो वजनी गटात अजित शिवाजी खोत यांनी फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. ५५ किलो वजनी गट ग्रीको-रोमन प्रकारात प्रथमेश बाजीराव कुंभार याने सुवर्ण पदक, तर ७१ किलो वजनी गटात यश चंद्रकांत खाडे याने रौप्य पदक पटकावले. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली. त्यांना संस्थाध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्ष तृप्ती शाह, प्राचार्य प्रशांत शाह, उपप्राचार्य ए. डी. पवार, पर्यवेक्षक पी. एम. जाधव, जिमखानाप्रमुख रवींद्र चव्हाण, प्रशिक्षक शिवाजी संकपाळ, वसंत पाटील, क्रीडाशिक्षक निरंजन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.