फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

पूर्वाधानंतरही सुमारे १२ मिनिटे राहिलेली ०-० अशी गोल कोंडी फोडण्यात ब्राझीलला यश आले आणि चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
पूर्वार्धात सर्बियाने अफलातून संरक्षण करीत ब्राझीलला गोल करण्यापासून वंचित ठेवले. विशेषतः त्यांनी स्टार स्ट्रायकर नेमारभोवती कडे केल्यासारखीच स्थिती होती. दहाव्या मिनिटाला मिळालेली फ्री किक सर्बियानेच्या बचाव फळीने रोखली. तेराव्या मिनिटाला मिळालेला कॉर्नरही सर्बियाचा गोलरक्षक मिलिन्कोविक-सॅविकने परतावून लावला. सुरुवातीच्या काही काळ दडपणखाली असलेले सर्बियाचे खेळाडू नंतर मात्र खुले होवून खेळू लागले. त्यांनी ब्राझीलची पुरती कोंडी केली होती. ब्राझीलच्या आक्रमक फळीने १५, ३५ यार्डांवरून गोल जाळ्याच्या दिशेने मारलेले फटके सर्बियाच्या गोलरक्षकाने लिलया रोखले. पूर्वार्धात दोन्ही संघांचा समसमान वेळेत चेंडूवर ताबा राहिला.