परीख पूल आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीख पूल आंदोलन
परीख पूल आंदोलन

परीख पूल आंदोलन

sakal_logo
By

64550

परीख पुलासमोर होडी आंदोलन
पर्यायी उपाययोजनांना सुरूवात करा; नूतनीकरण समितीची मागणी

कोल्हापूर, ता. २५ ः परीख पुलाच्या पर्यायी उपाययोजनांना तातडीने सुरूवात करावी अन्यथा तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी करत परीख पूल नूतनीकरण समितीने आज दिवसभर पुलासमोर होडीत बसून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
परीख पुलासाठी दोन पर्यायांचे आराखडे तयार केले आहेत. त्यातील भुयारी मार्गाच्या तांत्रिक तपासणीसाठी रेल्वे विभागाने दहा लाख रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले आहे. तशातच आणखी एक उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे नूतनीकरणाचा मुद्दा बाजूला पडण्याबरोबरच केवळ पादचारी पुलाची चर्चा होऊन वाहतुकीचा व त्यातून नागरिकांच्या जीवितास धोका उद्‌भवण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी आज होडीमध्ये बसून दिवसभर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्सने सादर केलेल्या डिझाईनला हरकती येण्याची शक्यता नसल्याने पावसाळ्यापूर्वी परीख पुलास पर्याय मिळू शकतो. नूतनीकरणास मान्यता मिळत नसल्यास व महापालिका पर्याय देत नसल्यास येथील वाहतूक रेल्वेने बंद करावी, अशा मागणीच्या निवेदनाचा ई मेल समितीने होडीत बसून केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फोनवरून आंदोलकांशी चर्चा करत रेल्वेच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले. आंदोलनस्थळी कम्युनिस्ट पक्षाने, आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला. समितीने रेल्वे प्रबंधकांनाही निवेदन दिले.
फिरोज शेख, राजवर्धन यादव, सुशील हंजे, संजय घाडगे वंदूरकर, गौरव लांडगे, आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अजय कोराणे, माजी उपमहापौर संजय मोहिते, आजम जमादार, दीपा शिपूरकर, महादेव पाटील, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, संदीप संकपाळ, प्रवीणचंद्र वायचळ, अशोक रेगडे, राधेश्याम रेगडे, शिवनाथ बियाणी, संजय पवार आदी उपस्थित होते.