खगोलीय वस्तू पाहण्यासाठी टेलिस्कोपची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खगोलीय वस्तू पाहण्यासाठी टेलिस्कोपची निर्मिती
खगोलीय वस्तू पाहण्यासाठी टेलिस्कोपची निर्मिती

खगोलीय वस्तू पाहण्यासाठी टेलिस्कोपची निर्मिती

sakal_logo
By

64583

गृह, तारे ‘दृष्टि’क्षेपात...
प्रा. डॉ. अविराज जत्राटकर यांनी साकारली कमी खर्चात दुर्बीण

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : अब्जावधी चांदण्या, ग्रह, तारे, आकाशस्थ वस्तूंनी आकाश भरलले असतं. आकाशाच्या आत अवकाशाची अनंत पोकळी. त्या पोकळीकडे अन्‌ आकाशाकडे पाहण्यासाठी दुर्बीण ही पहिली पायरी. दुर्बीणीच्या माध्यमातून खगोलीय वस्तूंचा वेध घेता येतो. यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दुर्बीणींची संख्या नगण्य आहे, ही अडचण ओळखून सोळांकूर येथील यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. अविराज जत्राटकर यांनी स्वतः दुर्बीणी तयार करण्यासाठी पाऊले उचलली. लोकांची मागणी, गरजेनुसार दुर्बिणी तयार करून द्यायला सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्रातील खगोलप्रेमींसाठी मोठी संधी डॉ. जत्राटकर यांनी उपलब्ध केली.
खगोलशास्त्रात निरीक्षणे नोंदवण्यासाठी दुर्बीण महत्त्वाची असते. पूर्वी दुर्बीणी विकत घ्यायची म्हटले की, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातील संस्थांशी संपर्क साधावा लागत असे. यासाठी वेळ, पैसाही लागत असे. शिवाय अशी दुर्बीण विकत घेऊनही त्याची डागडुजी करायची असेल तर माहितीअभावी ते करणे शक्य नव्हते, म्हणून ‘स्पेसटेक’ ही खगोलशास्त्रीय दुर्बीणी तयार करणारी कंपनीची डॉ. जत्राटकर यांनी स्थापना केली. या कंपनीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. शाळा, महाविद्यालय, हौशी खगोलप्रेमींकरिता कमी खर्चात दुर्बीण तयार करून दिली जाते.
आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खगोलप्रेमींना या दुर्बीणीचा लाभ मिळाला. डॉ. जत्राटकर यांनी शक्तिशाली दुर्बीणीही तयार करून दिली आहे. सध्या त्यांच्याकडे तीन शक्तिशाली दुर्बीणी आहेत. प्रत्येक शाळेत एक दुर्बीण (टेलिस्कोप) पोहोचवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. खगोलशास्त्र फक्त छंद म्हणून न पाहता उत्तम करिअरच्या दृष्टीकोनातून पाहा, असे ते सांगतात. खगोलशास्त्र सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ स्टारगेझिंग अँड इन्स्ट्रुमेंटेशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली.

चौकट
दुर्बीणीची निर्मिती अशी
-विद्यार्थ्यांनी स्वतः दुर्बीण तयार करण्यासाठी कार्यशाळा
-हौशी खगोलप्रेमींना मोठी दुर्बीण तयार करण्याचे प्रशिक्षण
-कमी खर्चात कितीही मोठी दुर्बीण तयार करता येते
-दुर्बीणीचे रिफ्लेक्टर, रिफ्रॅक्टर, कॅसेग्रेन असे प्रकार
-रिफ्लेक्टर दुर्बीणीचा जास्त प्रमाणात वापर
-रिफ्लेक्टरची किंमत कमी, वापरायला सोपी
-रिफ्लेक्टरमध्ये अंतर्वक्र आरसे, विशिष्ठ भिंगांचा वापर
-कॅसेग्रेन प्रकारात आरसे, भिंगांचा वापर
...
कोट
प्रत्येक शाळेत, गावात किमान एक दुर्बीण असावी, हे आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयात अनेक व्याख्याने दिली. आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम घेतले. आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्र, राशी, धुम्रमय नक्षत्रसमुह, इतर अवकाशीय घटकांची माहिती दिली. दुर्बिणीतून त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण घडवले जाते.
-प्रा. डॉ. अविराज जत्राटकर