सायबर सिक्युरिटीवर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर सिक्युरिटीवर कार्यशाळा
सायबर सिक्युरिटीवर कार्यशाळा

सायबर सिक्युरिटीवर कार्यशाळा

sakal_logo
By

सायबर सिक्युरिटीवर कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळा झाली. डोमेने कॉम्प्युटरचे संस्थापक एम. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. राधिका हुलगबाळी, प्रा. पी. एस. कुलकर्णी, प्रा. पौरवी पाटील, प्रा. अंकिता चोपडे आदी सहभागी झाले होते. सायबर फसवणुकीची जाणीव करून देणे व तांत्रिक ज्ञान घेणे हा कार्यशाळामागचा हेतू होता. श्री. पाटील यांनी वेब टेक्नॉलॉजी, सायबर क्राईम, सोशल मीडियातील गोपनियता, इंटरनेट बँकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाईल सुरक्षा, डेटा बॅकअप, वाय-फाय सुरक्षा, अँटी व्हायरस, सायबर हल्ला, ऑनलाईन जॉब फ्रॉड, सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयांची माहिती दिली. संस्थाध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव अ‍ॅड. बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, महेश घाळी, डॉ. कोल्हापूर यांचे प्रोत्साहन मिळाले.
------------------------------------------------------

आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. स्टेट बँकेच्या येथील शाखेचे शाखाधिकारी उमेश म्हस्के यांनी साक्षरतेची माहिती दिली. प्रा. आर. डी. कमते यांनी स्वागत केले. ग्राहकांसाठीच्या विविध योजना, शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अर्थसहाय्याची माहिती दिली. अधिकारी निखिल कमते यांनी कष्टाच्या पैशांची बचत कशी करावी, ती भविष्यासाठी कशी उपयुक्त ठरते याबाबत मार्गदर्शन केले. अमर कुडित्रेकर यांनी आरोग्य विम्याचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ. कदम यांचेही भाषण झाले. प्रा. आझाद पटेल, प्रा. के. एस. देसाई आदी उपस्थित होते.