डेंगी सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी सर्व्हे
डेंगी सर्व्हे

डेंगी सर्व्हे

sakal_logo
By

शहरात १५ घरांत डासअळ्या
कोल्हापूर : शहरात डेंगी व चिकुनगुण्यासाठी विविध ठिकाणी केलेल्या सर्व्हेत १५ घरांत डासअळ्या सापडल्या. त्या परिसरात धूर व औषध फवारणी केली जात आहे. अंबाई डिफेन्स कॉलनी, विक्रमनगर, जुईनगर, उलपे मळा, शुगर मिल बावडा, राजारामपुरी तिसरी गल्ली, मोहिते कॉलनी, दत्तोबा शिंदे नगर, प्रथमेश नगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मी नगर, एलआयसी कॉलनी, सोमेश्वर गल्ली, कलकुटकी गल्ली, राजेंद्रनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, म्हाडा कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. ६५५ घरांची तपासणी केली. यामध्ये ११७१ कंटेनरपैकी १५ मध्ये डासअळ्या सापडल्या. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, फ्रिजमागील पाण्याचे ट्रे, झाडाच्या कुंडयांमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच सर्वेक्षणासाठी येणा-या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे; असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.