इचलकरंजीत शिवतीर्थावर दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत शिवतीर्थावर दीपोत्सव
इचलकरंजीत शिवतीर्थावर दीपोत्सव

इचलकरंजीत शिवतीर्थावर दीपोत्सव

sakal_logo
By

64715
इचलकरंजीत शिवतीर्थावर दीपोत्सव
इचलकरंजी, ता. २५ ः येथील देव दीपावलीनिमित्त शिवतीर्थावर गुरुवारी सायंकाळी दीपोत्सव आणि आतषबाजी केली.
जय शिवाजी-जय भवानी, जय श्रीरामच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. या वेळी शिवतीर्थ परिसर गर्दीने फुलला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा असलेल्या शिवतीर्थ परिसरात देव-दीपावलीचे औचित्य साधून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. या वर्षीही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ परिसर एलईडी बल्ब, लेसर शो आणि फुलांच्या माळांनी सजवले होते. त्यामुळे परिसर शिवमय झाला होता. सायंकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, गजाजन महाजन, आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, पुंडलिक जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक आरती झाली. या वेळी झालेल्या आतषबाजी आणि दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला होता. जय शिवाजी-जय भवानी, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. कार्यक्रमासाठी तरुणाईसह शहरवासीयांनी गर्दी केली होती.