Gag251_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag251_txt.txt
Gag251_txt.txt

Gag251_txt.txt

sakal_logo
By

Gag२५१०१
64698
गगनबावडा : तहसीलदार डॉ. कोडे यांना निवेदन देताना विनायक सणगर, संजय सुतार, श्रीकांत पाटील व इतर.

निवडेत गायरान अतिक्रमणप्रश्‍नी
मतदानावर बहिष्काराचा निर्णय

गगनबावडा ः निवडे (ता. गगनबावडा) ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीतील घरे काढण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अन्यायग्रस्त मिळकतधारकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना मोर्चाद्वारे जाऊन शुक्रवारी निवेदन दिले.
निवडे ग्रामपंचायत हद्दीत १९८० पासून बेघर वसाहत आहे. नागरिकांना घरबांधकामासाठी प्लॉट मंजूर झाले. घरेही बांधली आहेत. ग्रामपंचायतीने घरफाळा आकारून वीज, पाणी व इतर सुविधा पुरविल्या; परंतु अतिक्रमण असल्याबाबत आजअखेर नोटीस दिली नाही. शासन परिपत्रकानुसार २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियामित करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळेच घरे काढण्याच्या नोटिसा लागू केल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विनायक सणगर, माजी उपसरपंच संजय सुतार, श्रीकांत पाटील, बाळू शेटे, मनोज सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्या संगीता पोवार, माजी उपसरपंच दिलीप राऊत, संजय लोखंडे, बाळू कुंभार, सलीम मालकापुरे, रिहाना मुल्ला, अलका खाटकी यांच्या सह्या आहेत.