प्रतिकात्मक अंत्ययात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक अंत्ययात्रा
प्रतिकात्मक अंत्ययात्रा

प्रतिकात्मक अंत्ययात्रा

sakal_logo
By

64750

शिवसेना ठाकरे गटाकडून
कर्नाटक सरकारचा निषेध

बोम्मईंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; शिवसैनिक, पोलिसांत झटापट

कोल्हापूर, ता. २५ : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढताना ठाकरे गटाचे शिवसैनिक व पोलिस यांच्यात आज झटापट झाली. शिवैसनिकांनी थेट मध्यवर्ती बस स्थानकावर धाव घेऊन कर्नाटकच्या बसगाड्या स्थानकात येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. कर्नाटक बसगाडीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत हा कर्नाटकचा भाग असल्याचे म्हटले होते. तसेच सोलापूर व अक्कलकोट हा कन्नडभाषिक प्रांत असून, तो कर्नाटकात समाविष्ट करावा, असे वक्तव्य केले. त्याचे पडसाद कोल्हापुरात आज उमटले. ठाकरे गटाचे शिवसैनिक बोम्मई यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यासाठी दसरा चौकात जमले. त्यांनी अंत्ययात्रा काढण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिस व शिवसैनिकांत झटापट झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी थेट मध्यवर्ती स्थानकाकडे धाव घेतली. कर्नाटकातून येणाऱ्या बसगाड्यांना स्थानकात प्रवेश करू देणार नाही, असा पवित्रा घेतला.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, गोविंद वाघमारे, विशाल देवकुळे, दिनेश साळोखे, धनाजी यादव, विकी मोहिते, किशोर माने, सुरेश कदम, महादेव कुकडे, स्मिता सावंत, स्वरूपा खुरंदळे, पूनम फडतरे, सविता कानूरकर, किशोर दाभाडे, विशाल पाटील, प्रदीप हांडे, राजेंद्र पाटील, अक्षय ओतारी सहभागी झाले होते.