मुख्य निवडणूक अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य निवडणूक अधिकारी
मुख्य निवडणूक अधिकारी

मुख्य निवडणूक अधिकारी

sakal_logo
By

तरुणांची मतदान नोंदणी आवश्यक
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर, ता. २५ : तरुणांनी मतदान आणि मतदान नोंदणी केली पाहिजे. त्यासाठी ज्या तरुणांची मतदार यादीत नोंदणी झालेली नाही, अशा कॉलेज तरुणांना महाविद्यालयात प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणीचा अर्ज देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. दरम्यान, मतदार जनजागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने उद्या (ता. २६) संविधान दिनाचे औचित्य साधून ‘जगण्यातलं संविधान'' या विषयावर परिसंवाद घेतला जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी १० पासून परिसंवाद सुरु होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, ‘‘मतदार नोंदणीसाठी आता प्रत्येक महाविद्यालयात मोहीम राबवली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम सुरू होईल. महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत असतानाच मतदार नोंदणीही करून घेण्याबाबत विचार सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांने मतदार नोंदणी केली आहे. त्यांचा मतदान क्रमांक आणि ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांच्यासाठी वेगळा कॉलम देऊन मतदार नोंदणीही करता येईल. तरुणांनी मतदार नोंदणी आणि मतदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठ येथे परिसंवाद होईल. यामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, सॅबी परेरा, कीर्तनकार सचिन पवार, प्राध्यापक राहुल सरवटे, प्रा. गायत्री लेले मागदर्शन करतील.’’ या वेळी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्‍याया पुस्तकाचे प्रकाशन लोक साहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांच्या हस्ते होईल.